नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला - स्थापना १९८३

नांदेड शहरात अखंड चालू असलेली नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला ही नांदेडच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. स्वानंद मित्र मंडळाच्या पुढाकाराने १९८३ साली नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेची स्थापना झाली. १९८३ ते १९९३ पर्यंत , महाराष्ट्रातल्या अनेक ख्यातनाम व व्यासंगी साहित्यिकांना नांदेड येथे आमंत्रित करून विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्याने आयोजित केली. १९९४ ते २००० पर्यंत रूपवेध ग्रंथालय आणि नरहर कुरुंदकर वाचनालय यांनी संयुक्तपणे या व्याख्यानमालेची धुरा अत्यंत समर्थपणे वाहिली. गेल्या अकरा वर्षापासून रूपवेध ग्रंथालय आणि नांदेड येथील प्रा. कुरुंदकर यांचे विद्यार्थी ही व्याख्यानमाला त्याच उत्साहाने पुढे चालू ठेवत आहेत.या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या मान्यवरांची नाव, सहभागाचे वर्ष आणि विषयाची सूची या पुढे नमूद केली आहे.

१९८३ श्रीमती दुर्गा भागवत मुंबई १. शासन साहित्यिक आणि बांधिलकी
१९८3 श्री. गंगाधर गाडगीळ – मुंबई १. बी रघुनाथ यांची कथा,, २ ना धो महानोर यांची कविता , ३. नरहर कुरुंदकर यांची साहित्य समीक्षा
१९८४ श्री. भालचंद्र फडके १. स्वातंत्र्योत्तर साहित्यातील प्रेरणा आणि प्रश्न , २. साहित्यिक आणि बांधिलकी ३. चित्रपट , रेडीओ, दूरदर्शन , हि लोकसंवाद माध्यमे आणि सांस्कृतिक जडण घडण.
१९८५ डॉ. जयंत नारळीकर –पुणे १. ग्रह आणि तारे 2.विश्वाचा व्याप आणि व्युत्पत्ती 3. पृथ्वी पलीकडची जीवसृष्टी
१९८६ श्री. मारुती चित्तमपल्ली –नागपूर १ पक्षी निरीक्षण २. अरण्यवाचन ३. मुलाखत - जंगलातले दिवस
१९८७ श्री. देविदास बागुल – पुणे १. छायाचित्रकला २. तैसे निसर्गाचे व्यापकपण ३. नवे बालसंगोपन
१९८८ डॉ गो. ब. देगलूरकर – पुणे १. अरुपाचे रूप दावीन २. दर्शचीत्रे अजिंठ्याची ३. इतिहासाशी देणे घेणे.
१९८९ श्री. माधव मनोहर - मुंबई - मराठी नाटकाची वाटचाल.
१९९० डॉ. पद्माकर दादेगावकर -हैदराबाद - ज्ञानेश्वरीची रस समीक्षा.
१९९० प्रा. म. द. हातकणगलेकर- सांगली - मराठी कथेची वाटचाल.
१९९१ श्री. भालचंद्र पेंढारकर- मुंबई - मराठी संगीत नाटकाची वाटचाल.
१९९२ डॉ. दत्ता भगत – नांदेड- दलित साहित्य पार्श्वभूमी.
१९९३ डॉ. रवींद्र किबहुने - औरंगाबाद - आधुनिकतेची संकल्पना , अधुनिकातावाद आणि भारतीय सांस्कृतिक परंपरा ,
अधुनिकातावाद : मराठी साहित्याच्या संदर्भात

१९९४ फादर फ्रान्सीस दिब्रितो – वसई- १. शिक्षण कुणासाठी? कशासाठी? २. आजची आव्हाने
१९९४ श्री. अशोक जैन- मुंबई - राजकारण आणि पत्रकारिता
१९९५ प्रा. सौ. पुष्पा भावे – मुंबई-आत्मचरित्राचा वाड्;मयीन विचार आणि सामाजिक दस्तऐवज म्हणून विचार,
२. स्त्रियांची आत्मचरित्रे, ३. दलित स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे

१९९६ पद्मविभूषण विजय तेंडूलकर - मुंबई - १. जरा वेगळ्या माणसाबद्दल २. प्रकट मुलाखत - मुलाखतकार डॉ लक्ष्मण देशपांडे आणि प्रा. दत्ता भगत
१९९७ श्री. कुमार केतकर - मुंबई - बदलत्या जगाचे रंग
१९९७ डॉ. य. दि. फडके - मुंबई - १. नेताजी सुभाषचंद्र बोस : राष्ट्रीय नेतृत्व २. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सशस्त्र स्वातंत्र्यलढा
१९९८ डॉ. न. गो. राजूरकर हैदराबाद- १. पं. नेहरू:व्यक्तिमत्वाची व नेतृत्वाची विविध परिमाणे भाग १ आणि भाग २
१९९९ श्री. दिलीप कुलकर्णी कुडावळे- विकासच्या साम्यक वाटा
२००० श्री. विनय हर्डीकर- पुणे- राष्ट्रवादाचे बदलते संदर्भ
२००१ श्री. प्रकाश बाळ- मुंबई -१. काश्मीरची समस्या; स्वरूप, २. काश्मीरच्या समस्येवर तोडगा कसा निघेल ?
२००२ प्रा. राम शेवाळकर - नागपूर - १. आचार्य प्र. के. अत्रे यांचे वक्तृत्व २. पु. ल. देशपांडे यांचे वक्तृत्व
२००३ प्रा. मधुकर राहेगावकर, श्री. ग. पि. मनूरकर, प्रा. भु. द. वाडीकर - आठवणी गुरुजींच्या अध्यक्ष - प्र. गो. रा. म्हैसेकर.
२००३ ले. ज. डी. बी. शेकटकर - पुणे १. भारतीय संरक्षणाच्या बदलत्या दिशा २. भारतातील दहशतवाद व त्याचे बदलते स्वरूप
२००४ श्री. अशोक वाजपेयी दिल्ली -१. हमारी दुनिया २. साहित्य क्यो?
२००५ डॉ. शशिकांत सावंत - उज्जैन - १. बृहन्महाराष्ट्रात घडणारे महाराष्ट्र दर्शन २. मला जाणवलेले नरहर कुरुंदकर
२००६ डॉ. सादिक - दिल्ली - १. भारत मे सुफिवाद, २. सुफिवाद-इतिहास, परंपरा, और वर्तमान
२००७ श्री. विजय पाडळकर - नांदेड- गुलजार:एका कलावंताचा प्रवास
२००७ श्री. गुलजार - मुंबई - दृकश्राव्यकला और साहित्य
२००८ डॉ. सदानंद मोरे - पुणे - लोकमान्य ते महात्मा भाग १ व २
२००९ प्रा. सुरेश द्वादशीवार - नागपूर - १. सेक्युलरीझम आणि नरहर कुरुंदकर २. नरहर कुरुंदकर: व्यक्ती आणि कार्य
२०१० न्या. नरेद्र चपळगावकर- औरंगाबाद - प्रबोधन पर्वातील तीन न्यायमूर्ती
२०११ मनीषा वर्मा - दिल्ली - सुप्रशासन आणि जनहक्क: एक दृष्टीकोन
२०१२ श्री. सुधीर मोघे अनुबंध : शब्द आणि सुरांचे
२०१३ डॉ. यशवंत सुमंत १ नागरी समाज: संकल्पना आणि स्वरूप २. भारतीय नागरी समाजाची जडण घडण आणि सद्यस्थिती
२०१४ प्रा. डॉ हरी नरके - १ मराठीचे जागतिक स्थान ,२ मराठीचा अभिजात दर्जा.                                                                                       

 २०१५ डॉ जब्बार पटेल (पुणे) यांची मुला​खत , श्री राज काजी - उपसंपादक दैनिक सकाळ, पुणे

​ २०१६ परिसंवाद विषय : १. प्रा . नरहर कुरुंदकर यांची सेक्युलॅरिझम विषयी भूमिका 
                                                    वक्ते : डॉ  . वि. ल. धारूरकर , श्री. अन्वर राजन अध्यक्ष : प्रा. शेषराव मोरे 
                                               २. डॉ. सुहास पळशीकर - विषय: कांग्रेस मुक्त भारत म्हणजे काय ?​