* नरहर कुरुंदकरांच्या स्मारकाचे माननीय मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन.
 
​* ​"आंतरविद्याशाखीय संशोधनपद्धती" या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. याचे उद्घाटन डॉ. सर्जेराव निमसे, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्रात डॉ. मिलिंद आगाशे (मुंबई), डॉ. निशिकांत मिरजकर (दिल्ली), डॉ. सदानंद मोरे (पुणे) आणि डॉ.एल.एस. देशपांडे    (नांदेड) यांचे मार्गदर्शन मिळाले. 
 
* नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन श्री.तू.शं. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
* कै. नरहर कुरुंदकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. 
 
* "आदिवासी संशोधन क्षेत्र: स्वरूप व दिशा " या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. अशोक बेलखोडे हे होते. मा.डॉ.गणेश देवी यांचे वरील विषयावर व्याख्यान झाले.